नेटवर्क टोपोलॉजी –

नेटवर्क टोपोलॉजी – थोडक्यात माहिती

नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे संगणक नेटवर्कमधील उपकरणांची रचना व जोडणी कशी आहे, याचे वर्णन. योग्य टोपोलॉजी निवडताना खर्च, स्पीड, देखभाल, सुरक्षा यांचा विचार होतो.


1.Bus Topology (बस):

सर्व संगणक एका वायरवर जोडलेले.

फायदे: कमी वायर, स्वस्त, लहान नेटवर्कसाठी योग्य.

तोटे: एक बिघाड झाला की संपूर्ण नेटवर्क बंद.

2. Star Topology (स्टार):

प्रत्येक संगणक हब/स्विचशी जोडलेला.

फायदे: देखभाल सोपी, जलद स्पीड.

तोटे: हब बंद झाला की नेटवर्क बंद, वायर जास्त लागतात.

3.Ring Topology (रिंग):

संगणक वर्तुळात जोडलेले.

फायदे: डेटा एकाच दिशेने फिरतो.

तोटे: एक त्रुटी म्हणजे संपूर्ण नेटवर्क बंद.

4.Mesh Topology (मेश):

प्रत्येक संगणक इतर प्रत्येकाशी जोडलेला.

फायदे: विश्वासार्ह व सुरक्षित.

तोटे: वायरिंग खूप, महाग.

5.Tree Topology (ट्री):

स्टार + बस टोपोलॉजीचं मिश्रण.

फायदे: विभागीय नेटवर्क, विस्तार सोपा.

तोटे: मुख्य लाईन बंद झाली तर अडचण.

6.Hybrid Topology (हायब्रिड):

एकापेक्षा अधिक टोपोलॉज्यांचे मिश्रण.

फायदे: लवचिक व कार्यक्षम.

तोटे: क्लिष्ट रचना, खर्चिक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top